Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 15:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे, म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बसर्र्ब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील अत्यंत आदरणीय समजल्या जाणाऱ्या बर्शब्बा म्हटलेल्या यहुदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल, असे सर्व ख्रिस्तमंडळीसह प्रेषित आणि वडीलजन ह्यांना वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्‍यामधील पुढारी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 15:22
29 Iomraidhean Croise  

सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यांना ते बरे वाटले; राजा जे जे करी ते ते सर्व लोकांच्या मनास येई.


आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.


ही गोष्ट राजाला व सगळ्या जनसमुदायाला पसंत पडली.


तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सब्बा म्हटलेला योसेफ व मत्थिया, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले.


स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत.


तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते; ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले.


त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले.


त्या दिवसांत यरुशलेमेहून अंत्युखियास संदेष्टे आले.


त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवले : “अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा सलाम.


म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की,


ह्याकरता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे; ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील.


मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्यांमधून गेले, आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.


त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले.


यहूदा व सीला हे स्वत: संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.


पण पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपवल्यावर तो तेथून निघाला.


मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले.


मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.


मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला,


नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले.


त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.


तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि भक्तिमान हेल्लेणी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.


सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा पौल आत्म्याने प्रेरित होऊन ‘येशू हाच ख्रिस्त आहे,’ अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात गढून गेला होता.


मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले;


कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती.


देवपित्याच्या ठायी व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून :


माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहवून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan