Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 15:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, “बंधुजनहो, माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला; बंधुजनहो, माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, “बंधुजनहो, माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग त्यांचे बोलणे आटोपल्यावर याकोब म्हणाला, “बंधूंनो, माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 15:13
15 Iomraidhean Croise  

काही स्त्रियांही दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरीया व सलोमे ह्या होत्या;


तेव्हा ‘उगे राहा,’ म्हणून त्याने हाताने त्यांना खुणावले, आणि आपल्याला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले की, “हे याकोबाला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसर्‍या ठिकाणी निघून गेला.


परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तींचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की,


तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, “अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.


अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हांला दाखवली त्यांवरून देवाने तुमच्याकरता पाठवलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हांला माहिती आहे.


बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.


मग दुसर्‍या दिवशी पौल आमच्यासह याकोबाच्या येथे गेला; आणि सर्व वडीलही तेथे आले.


“बंधुजनहो व वडीलजनहो, मी जे आता तुम्हांला प्रत्युत्तर करतो ते ऐका.”


तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता ‘गौरवशाली देवाने’ त्याला दर्शन देऊन म्हटले,


परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही; मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला.


कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत असे; परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला.


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम.


माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan