प्रेषित 15:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा सर्व लोक गप्प राहीले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अद्भूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 सर्व लोक गप्प राहिले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्याद्वारे देवाने यहुदीतरांमध्ये जे चमत्कार व अद्भूत गोष्टी केल्या त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा बर्णबा व पौल यांच्याद्वारे गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराने जी चिन्हे व अद्भुते केली यांचे वर्णन ऐकत असताना सर्व सभा स्तब्ध राहिली. Faic an caibideil |
ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.