Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग ते सलमीनात असता त्यांनी यहूद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली; आणि योहान हाही त्यांचा सहायक होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 ते सलमीना या ठिकाणी आल्यावर त्यांनी देवाच्या वचनाची यहुदी लोकांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली. योहान ऊर्फ मार्क हा त्यांचा सेवक त्यांच्याबरोबर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 13:5
20 Iomraidhean Croise  

मग तो त्याच्या मागे जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची औते पेटवून त्यांवर मांस भाजले; ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलीयाबरोबर गेला व त्याची सेवा करू लागला.


हे ऐकून एलीया जीव घेऊन पळाला; तो यहूदातील बैर-शेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकराला ठेवले.


तेव्हा यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्या द्वारे आपल्याला परमेश्वराला प्रश्‍न करता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय?” इस्राएलाच्या राजाच्या सेवकांपैकी एकाने सांगितले, “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलीशा येथे आहे.”


तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला.


तसे तुमच्यामध्ये नसावे; तर जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल,


हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरीया हिच्या घरी गेला; तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते.


बर्णबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमेहून माघारी आले.


नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखियास पोहचले; आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले.


तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो.


मग इकुन्यात असे झाले की, यहूदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की, यहूदी व हेल्लेणी ह्यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला.


बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे.


ह्यामुळे तो सभास्थानात यहूद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालत असे.


तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे.


मग आपली सेवा करणार्‍यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.


इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले.


नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करत व प्रमाण पटवत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.


आणि त्याने लगेचच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की, “तो देवाचा पुत्र आहे.”


माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हांला सलाम सांगतो, (त्याच्याविषयी तुम्हांला आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुमच्याकडे आला तर त्याचा स्वीकार करा);


लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan