Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 13:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला, देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांस दिल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडे चारशे वर्षेपर्यंत वतन म्हणून दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्यांनी कनानातील सात राष्ट्रांना उलथवून टाकले व त्यांची भूमी वतन म्हणून त्यांच्या लोकांना दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 13:19
16 Iomraidhean Croise  

आपली बायको साराय, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहचले.


ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.”


इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चारशे ऐंशीव्या वर्षी, इस्राएलावरील शलमोनाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, दुसर्‍या म्हणजे जिव नावाच्या महिन्यात शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.


त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला; तू त्यांच्यादेखत देशातले कनानी रहिवासी ह्यांना पादाक्रांत केले; त्यांचे राजे व देशाचे लोक ह्यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यांना तू त्यांच्या हाती दिलेस.


अमोर्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला;


त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले.


त्याने त्यांच्यासाठी चिठ्ठी टाकली आहे, त्याने आपल्या हाताने मापनसूत्र लावून देश त्यांना वाटून दिला आहे; ते त्याचे सर्वकाळचे वतनदार होतील, ते पिढ्यानपिढ्या त्यात राहतील.


जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ‘ताब्यात घेतला’, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला.


जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल;


एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएली वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी ही वतने इस्राएल लोकांना कनान देशात वाटून दिली.


शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश


एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलाच्या वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी शिलो येथे दर्शनमंडपाच्या द्वारी परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकून ही वतने वाटून दिली. ह्याप्रमाणे देश वाटून देण्याचे संपले.


यार्देनेपासून पश्‍चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हांला तुमच्या वंशांचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत.


तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले.


हेशबोन व त्याची उपनगरे, अरोएर व त्याची उपनगरे आणि आर्णोनतीरीची सर्व नगरे ह्यांत आज तीनशे वर्षे इस्राएल वस्ती करून आहे, तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत?


Lean sinn:

Sanasan


Sanasan