Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 13:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्‍यांनी त्यांना सांगून पाठवले की, “बंधुजनहो, तुमच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला, “बंधुनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 नियमशास्त्राचे व संदेष्ट्याच्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संदेश पाठवला, “बंधुजनहो, तमुच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्‍यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 13:15
21 Iomraidhean Croise  

तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला.


योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते; तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो.


“बंधुजनहो, येशूला धरून नेणार्‍यांना वाट दाखवणार्‍या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य वर्तवले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.


कारण यरुशलेमवासीयांनी व त्यांच्या अधिकार्‍यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्बाथ दिवशी वाचून दाखवण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता, त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले.


कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”


तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुमच्यामध्ये देवाने माझी निवड केली.


तेव्हा सर्व हेल्लेणी लोकांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोने ह्यांपैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही.


तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला, आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.


बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.


हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”


तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.


त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला.


“बंधुजनहो व वडीलजनहो, मी जे आता तुम्हांला प्रत्युत्तर करतो ते ऐका.”


कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती;


तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता ‘गौरवशाली देवाने’ त्याला दर्शन देऊन म्हटले,


बोध करणार्‍याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्‍याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्‍याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्‍याने ती संतोषाने करावी.


संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.


परंतु त्यांची मने कठीण झाली; कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते; ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते.


कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;


बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan