Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 13:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तर पाहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू आंधळा होशील, व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली; तेव्हा आपल्याला कोणीतरी हात धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही,” मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन मनुष्यांचा शोध करू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील, व काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आपणाला कोणीतरी हाताला धरून न्यावे म्हणून तो आजूबाजूला माणसाचा शोध घेऊ लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.” तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 13:11
18 Iomraidhean Croise  

आणि घराच्या दाराशी जी लहानथोर माणसे जमली होती त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले; मग ती घर शोधून शोधून थकली.


मग अरामाच्या राजाने इस्राएलाबरोबर युद्ध आरंभले; त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की, “अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.”


माझ्या मित्रांनो, माझ्यावर दया करा हो, दया करा; कारण देवाचा हात माझ्यावर पडला आहे.


कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. (सेला)


तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत; तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे.


तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल; भयंकर मरी उद्भवेल.


परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत, संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे.


तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे; ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”


तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला; आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे.”


बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत;


जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.


ते निर्जल झरे, वादळाने उडवलेले धुके, असे आहेत; त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी सर्वकाल राखलेली आहे.


मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमवले आणि म्हटले, “इस्राएलाच्या देवाचा कोश येथून पाठवून द्या, तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करायचा नाही.” कारण सर्व नगरात कहर गुदरला होता, आणि देवाचा हात त्यांच्यावर जबर पडला होता.


तो कोश तेथे मिरवत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर गुदरला. त्याने त्या नगरातील आबालवृद्धांना पिडले; त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan