Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 12:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपायांच्या मध्ये निजला होता, आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 हेरोद त्याला बाहेर लोकांसमोर आणणार होता, त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता. पहारेकरी तुरुंगाच्या दरवाजापुढे पहारा करत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 हेरोद त्याला चौकशीसाठी बाहेर आणणार होता त्या आधीच्या रात्री, पेत्र दोन बेड्या घातलेला, दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता आणि पहारेकरी प्रवेशद्वारापुढे रक्षण करीत उभे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 12:6
17 Iomraidhean Croise  

म्हणून अब्राहामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात.


मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकान्तात निर्भय ठेवतोस.


गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यरुशलेम व यहूदा ह्यांतील जे लोक बंदिवान करून बाबेलास नेले त्या सर्वांबरोबर यिर्मयालाही बेड्या घालून रामा येथे आणले होते; तेथे त्याने यिर्मयाची सुटका केल्यानंतर यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :


आता पाहा, आज तुझ्या हातांत असलेल्या बेड्यांपासून मी तुला मुक्त करतो; तुला माझ्याबरोबर बाबेलास येणे बरे वाटले तर ये, मी तुझी चांगली व्यवस्था ठेवीन; पण माझ्याबरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नकोस; पाहा, सगळा देश तुझ्यापुढे आहे; तुला बरे व सोईचे वाटेल तिकडे जा.”


त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.


ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्‍यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.


तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला; मग ‘हा कोण व ह्याने काय केले’ असे तो विचारू लागला.


ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हांला बोलावले; कारण इस्राएलाच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे.”


“बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि बाहेर दरवाजांपुढे पहारेकरी उभे राहिलेले आम्हांला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हांला आत कोणी सापडले नाही.”


‘मी त्यांची दूरवर पांगापांग करीन, मानवातून त्यांची आठवणच बुजवीन’ असे मी म्हणालो असतो,


अनेसिफराच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही;


म्हणून आपण धैर्याने म्हणतो2 “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan