Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 12:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्यांनी तिला म्हटले, “तू बावचळलीस.” तरी तिने खातरीपूर्वक सांगितले की, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 विश्वास ठेवणारे रुदाला म्हणाले, “तुला वेड लागले आहे!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली, म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 त्यांनी तिला म्हटले, “तू वेडी आहेस”, तरीही तिने खातरीपूर्वक सांगितले, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ते तिला म्हणाले, “तुझे मन ठिकाण्यावर नाही,” परंतु ती आग्रहाने सांगू लागली, तेव्हा ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत असावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 12:15
10 Iomraidhean Croise  

ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”


मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते; तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खातरी झाली नसती.


सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.


आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.


नंतर अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला; आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंत:करणाचा कठीणपणा ह्यांविषयी त्यांना दोष लावला.


सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खातरीपूर्वक म्हणू लागला, “खरोखर हाही त्याच्याबरोबर होता; हा गालीलीच आहे.”


परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही.


मग पेत्र तसाच ठोकत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले.


ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता, फेस्त मोठ्याने बोलला, “पौला, तू वेडा आहेस; विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan