Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले आहे की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला निश्चित कळून आले की प्रभूने त्यांचा देवदूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोक ज्या गोष्टींची अपेक्षा करीत होते त्यापासून मला सोडविले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 12:11
27 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्‍चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील.


परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली?


तेव्हा अबीमलेखाने त्याला बोलावून म्हटले, “खचीत ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितलेस?” इसहाक त्याला म्हणाला, “मी विचार केला की, तिच्यामुळे माझ्या जिवाला अपाय होईल.”


परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.


परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”


‘ह्याच्या घरी मांसान्नाने तृप्ती झाली नाही असा एक तरी आढळेल,’ असे माझ्या डेर्‍यातल्या लोकांनी म्हटले नसेल,


तो तुला सहा संकटांतून सोडवील; सातांनी तुला काही अपाय होणार नाही.


कारण दरिद्र्याचा जीव दोषी ठरवणारे जे आहेत त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो.


पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,


त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.


परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.


परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.


परमेश्वर त्याचे रक्षण करील. व त्याचा प्राण वाचवील; भूतलावर तो सुखी होईल, आणि तू त्याला त्याच्या वैर्‍यांच्या इच्छेवर सोडणार नाहीस.


अहो परमेश्वरावर प्रीती करणार्‍यांनो, वाइटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतो. तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवतो.


तो म्हणाला, पाहा! चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते; त्यांना काहीएक इजा पोहचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे.


तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले; त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याचा धन्यवाद असो!


माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”


नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्‍यांना भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे.


तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला; त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातांतील साखळदंड गळून पडले.


पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.


तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, “यरुशलेमेस जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?”


परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले,


ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan