Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 10:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ते म्हणाले, “कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचवले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हास आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते कर्नेल्य हा शताधिपती आहे, तो नीतिमान मनुष्य आहे तो देवाची उपासना करतो, सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हास घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्यास सांगितले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 ते म्हणाले, “रोमन अधिकारी कर्नेल्य हा सद्‍गृहस्थ असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याला आदरणीय मानतात. त्याला पवित्र देवदूताने सुचविले आहे की, आपल्याला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्या माणसांनी उत्तर दिले, “आम्ही कर्नेल्य शताधिपतीकडून आलो आहोत. ते नीतिमान आणि परमेश्वराला भिऊन वागणारे मनुष्य आहेत, सर्व यहूदी लोकांकडून सन्मानित झालेले आहेत. एका पवित्र दूताने त्यांना सांगितले की तुम्ही पेत्राला तुमच्या घरी बोलवावे म्हणजे तुमच्याकडील संदेश त्यांना ऐकता येईल”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 10:22
36 Iomraidhean Croise  

जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी नीतिमान चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.


पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही; नीतिमान तर आपल्या विश्वासाने1 वाचेल.


तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.


मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्‍या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.


कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.


ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.”


तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता.


यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता.


जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वत:च्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”


मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो,


कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.


आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.


शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत;


तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.


पेत्र त्या माणसांकडे खाली येऊन म्हणाला, “पाहा, ज्याचा शोध तुम्ही करत आहात तो मी आहे; तुम्ही कोणत्या कारणामुळे येथे आलात?”


तेव्हा कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी आपल्या घरी तिसर्‍या प्रहरी प्रार्थना [व उपास] करत होतो; तेव्हा पाहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यापुढे उभा राहून म्हणाला,


म्हणून मी आपणाकडे माणसांना तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.”


तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्‍या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्‍यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]”


ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल.’


मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता, आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.


आणि [मृत झालेल्या] नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.


तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू;


कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे; “नीतिमान विश्वासाने जगेल” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे.


ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली;


ती समुद्रापलीकडे नाही; ‘आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणील आणि आम्हांला ती ऐकवील’ असे तुला म्हणावे लागणार नाही.


त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी.


माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.”


विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती.


स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,


ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा ह्याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आमच्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.


देमेत्रियाविषयी सर्वांनी व स्वत: सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे; आम्हीही साक्ष देतो; आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला ठाऊक आहे.


तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan