Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 प्रेषित येशूबरोबर एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभो, तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापन करणार त्याची वेळ हीच आहे का?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग ते त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांनी विचारले, “हे प्रभू, यावेळी आपण इस्राएलच्या राज्याची पुनर्स्थापना करणार आहात काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 1:6
23 Iomraidhean Croise  

यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


आणि मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणे न्यायाधीश व आरंभीच्याप्रमाणे मंत्री पुन्हा नेमीन; आणि मग तुला नीतिमत्तेची नगरी, विश्वासू नगरी म्हणतील.”


तरच याकोब व माझा सेवक दावीद ह्यांच्या संततीचा मी त्याग करीन आणि दाविदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या संततीवर सत्ता चालवण्यास ठेवणार नाही; मी तर त्यांचा बंदिवास उलटवीन व त्यांच्यावर दया करीन.”


राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा जे पवित्र जन ह्यांना देण्यात येतील; त्याचे राज्य सनातन आहे, सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्याचे अंकित होतील.”


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन;


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


त्याने उत्तर दिले, “‘एलीया’ येऊन सर्वकाही ‘यथास्थित’ करील हे खरे;


त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, “तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.”


तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकान्ती येऊन म्हणाले, “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.”


त्याने त्यांना उत्तर दिले, “एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी व तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय?


देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही;


ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला; कारण तो यरुशलेमेजवळ होता, आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते.


जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांला नेमून देतो.


त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan