Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 1:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्यास अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली, तेव्हा त्याची अकरा प्रेषितांत भर घालण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 1:26
15 Iomraidhean Croise  

ह्याप्रमाणे दोन्ही घराण्यांतले पुरुष घेऊन त्यांची चिठ्ठ्या टाकून वाटणी केली; कारण पवित्रस्थानाचा अधिकार व देवाकडची सरदारी एलाजार व इथामार ह्या दोन्ही वंशांतल्या पुरुषांकडे होती.


मग याजक, लेवी व इतर एकंदर लोक अशा आम्ही सर्वांनी पुढील कार्यांसाठी चिठ्ठ्या टाकल्या म्हणजे नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर जाळण्यासाठी आपल्या पितृकुळांप्रमाणे वर्षानुवर्ष नियमित समयी आपल्या देवाच्या मंदिरात लाकडाची अर्पणे आणावीत.


लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत; वरकड लोकांपैकी दहांतल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि नऊ जणांनी इतर नगरांत वस्ती करावी हे ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.


ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्‍याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय.


पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.


अहरोनाने त्या दोन बकर्‍यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी.1


त्यांनी एकमेकांना म्हटले, “चला, आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.


ह्यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले.


तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सब्बा म्हटलेला योसेफ व मत्थिया, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले.


नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून तेथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली.


तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, “अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.


परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते साडेनऊ वंशांना चिठ्ठ्या टाकून वाटण्यात आले;


शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश


नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांच्यावर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan