Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु या सर्व विषयांमध्ये सावध राहा; दुःख सहन कर; ईश्वरीय शुभवार्तेच्या प्रचारकाचे काम कर आणि आपली सेवा पूर्ण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 4:5
28 Iomraidhean Croise  

हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्‍यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका;


मी तुमच्यावर पहारेकरी ठेवून तुम्हांला म्हटले, ‘रणशिंगाचा शब्द ऐका;’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकत नाही.’


“मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग.


“मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांबरोबर बोल. त्यांना सांग की, मी देशावर तलवार आणीन तेव्हा जर देशातल्या लोकांनी आपणांपैकी एकास निवडून पहारेकरी नेमले;


तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना सावध कर.


ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले.


प्रवासाला जात असलेल्या कोणाएका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे.


जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”


आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य; मी तुम्हांला खचीत सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील.


मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता.


आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;


ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे.


देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो.


अर्खिप्पाला सांगा की, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.”


ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.


कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्‍यांचा कित्ता हो.


तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यांत गढून जा.


म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नयेस; तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दु:ख सोसावे.


ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो.


ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.


म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्‍या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.


जागृत हो, आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर; कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan