Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 4:2
36 Iomraidhean Croise  

महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले; हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.


“ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.”


जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”


त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे;


तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”


मग ते सलमीनात असता त्यांनी यहूद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली; आणि योहान हाही त्यांचा सहायक होता.


मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.


मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले.


आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्‍या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.


आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्‍यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे.


आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा;


ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा.


देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो.


आणखी आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरता दार उघडावे;


तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;


बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.


संदेशांचा धिक्कार करू नका;


मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्यांकडे लक्ष ठेव.


बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणार्‍यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.


म्हणून जर कोणी त्यांपासून दूर राहून स्वत:ला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल.


विरोध करणार्‍यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे; कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्‍चात्तापबुद्धी देईल,


तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस;


ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल,


ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग.


बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan