Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्याची जे इच्छा बाळगतात त्या सर्वांचा छळ होईल

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 खरे पाहिले तर ख्रिस्त येशूंमध्ये जे सुभक्तीने जीवन जगण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांचा छळ होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 3:12
32 Iomraidhean Croise  

मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.


म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल;


अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्‍या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.


ते तुम्हांला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणार्‍या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.


माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”


मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत.


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही;


राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


जर कोणी अन्य तर्‍हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती, व सुभक्त्यनुसार जे शिक्षण ते, मान्य करत नाही,


विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत ह्याला :


धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे.


योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, “परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर आजपर्यंत असल्यामुळे आमची संख्या पुष्कळ वाढली असूनही तू आम्हांला वतनातला एकच वाटा का दिलास?”


परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हांला दु:ख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. ‘त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरू नका’,


तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?


त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तार्‍यांपैकी एक तृतीयांश तारे’ ओढून काढून ते ‘पृथ्वीवर पाडले’; ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणार्‍या स्त्रीपुढे उभा राहिला होता.


मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्‍याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan