Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 सत्याचे वचन दक्षतेने सांगणारा व स्वतःच्या सेवाकार्याची लाज न बाळगणारा असा देवाच्या पसंतीला उतरलेला कामगार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:15
29 Iomraidhean Croise  

तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.”


असले पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे.


तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?


अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हांला दाखवली त्यांवरून देवाने तुमच्याकरता पाठवलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हांला माहिती आहे.


कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.


कारण ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे.


ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस ह्याला सलाम सांगा. अरिस्तबूलच्या घरातील माणसांना सलाम सांगा.


आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा.


तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो; पण ते ज्ञान ह्या युगाचे नाही, आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.


कारण स्वत:ची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच पसंतीस1 उतरतो.


त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो.


आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही; तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकाला आपणांस पटवतो.


म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे.


मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.


तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे.


तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हांला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही माणसांना खूश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूश होईल असे बोलतो.


बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


म्हणून त्या ‘विसाव्यात येण्याचा’ आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये.


जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.


आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला.


म्हणून बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही;


आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन.


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा,


Lean sinn:

Sanasan


Sanasan