Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझी आई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याही ठायी आहे असा मला भरवसा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तो विश्वास तुझी आजी लोईस हिच्यामध्ये व तुझी आई युनीके हिच्यामध्येदेखील होता आणि तोच तुझ्यामध्येसुद्धा आहे, अशी माझी धारणा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुझी आई युनीके आणि तुझी आजी लोईस यांचा प्रभूवर जितका दृढविश्वास आहे आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 1:5
25 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे; मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे; तू माझी बंधने सोडली आहेत.


हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.


माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली.


मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे; मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस.


देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.


रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते; मी आपल्या मनात चिंतन करतो; माझा जीव विचारात पडला आहे की,


परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील, आणि ते सतत धाकात राहतील2


तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे, आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर.


इतके असूनही तिची बेइमान बहीण यहूदा मनापासून माझ्याकडे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो.”


नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!”


मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणार्‍या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप हेल्लेणी होता.


ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कोनाकोपर्‍यात घडलेले नाही.


मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खातरी आहे की, कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही; तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे, असे समजणार्‍याला तो निषिद्धच आहे.


कोणी माणूस एखादा दिवस दुसर्‍या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी.


बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करायला समर्थ आहात अशी तुमच्याविषयी माझी स्वतःचीही खातरी झाली आहे.


आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.


कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले,


तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने; पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने,


ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी.


ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.


ह्या कारणाने ही दुःखे मी सोसत आहे, तरी मी लाज धरत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरवसा आहे.


त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.


हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले.


जरी आम्ही असे बोलतो तरी, प्रियजनहो, तुमच्याविषयी आम्हांला ह्यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडित गोष्टींची खातरी आहे.


निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan