Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 3:8
14 Iomraidhean Croise  

तर यार्देनेतीरी जाऊन तेथून एकेकाने एकेक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हांला परवानगी द्या.” त्याने म्हटले, “बरे, जा.”


दररोज एक बैल व सहा चांगली मेंढरे शिजवत तसेच माझ्यासाठी पाखरे तयार करत आणि दर दहा दिवसांनी सर्व जातींचा द्राक्षारसही मेजावर येत असे, तरी मी अधिपतीच्या वेतनाचे अन्न सेवन केले नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा फार मोठा होता.


ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही.


आमची रोजची भाकर आज आम्हांला दे;


आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता.


माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.


आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो; आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करतो;


आम्हांला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय?


श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी व उघडेवागडेपणा, ह्या सर्वांमुळे मी अधिक आहे.


आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही; कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली; आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही.


चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.


बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे; तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रं-दिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.


बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे, आणि तुम्हांला कशाचीही गरज पडू नये म्हणून, आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपापला व्यवसाय करणे, आणि आपल्या हातांनी काम करणे, ह्यांची हौस तुम्हांला असावी.


अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वत:चेच अन्न खावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan