Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 3:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 ह्या पत्रातील आमचा बोध जर कोणी मानत नसेल, तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 3:14
29 Iomraidhean Croise  

“हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहचले आहेत.


हे परमेश्वरा, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जित कर.


मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही.


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


तिने वचन मानले नाही, बोध घेतला नाही; परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही.


पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तिचा बाप तिच्या तोंडावर केवळ थुंकला असता तरी तिला सात दिवस लाज वाटली नसती काय? म्हणून सात दिवस तिला छावणीबाहेर कोंडून ठेव; नंतर तिला आत आणावे.”


आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.


आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.


तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो.


म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा1 असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये.


तुम्ही जारकर्म्यांची संगत धरू नये, असे मी आपल्या पत्रात तुम्हांला लिहिले होते;


आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत.


हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतींत आज्ञापालन करता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे.


आणि तुम्ही सर्वांनी भीत भीत व कापत कापत त्याचा स्वीकार करून आज्ञांकितपणा दर्शवला ह्याची तो आठवण करतो; म्हणून त्याला तुमच्याविषयी आत्यंतिक ममता आहे.


तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ.


म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;


हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील मंडळीतही वाचायला मिळावे; व लावदिकीयांकडील पत्र तुम्हीही वाचावे.


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणार्‍या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या संप्रदायांप्रमाणे न चालणार्‍या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे.


ह्यासाठी की, विरोध करणार्‍याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.


तट पाडणार्‍या माणसाला एकदा-दोनदा बोध करून मग त्याला वर्ज्य कर;


तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे, आणि मला ठाऊक आहे की, मी जे म्हणतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील.


आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.


हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका;


Lean sinn:

Sanasan


Sanasan