Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 ह्यामुळे त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांच्यामध्ये भ्रांतीचे कार्य चालू राहील, असे देव करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 2:11
21 Iomraidhean Croise  

“आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले,” हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला.


शाप देण्याची त्याला आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागो; आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला मुको.


तो राख भक्षण करतो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे; तो आपला जीव वाचवू शकत नाही; “माझ्या उजव्या हातात आहे ती साक्षात लबाडी नव्हे काय?” असे तो म्हणत नाही.


त्या अर्थी मी त्यांच्यासाठी दुर्दशा पसंत करीन, ज्याची त्यांना भीती वाटते ते त्यांच्यावर आणीन; कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिले नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले, मला जे नापसंत ते त्यांनी पसंत केले.”


कारण मी तुम्हांला तुमच्या देशातून घालवावे, तुम्हांला हाकून लावावे व तुम्ही नष्ट व्हावे म्हणून ते तुम्हांला खोटा संदेश देतात.


तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, ‘तुमचे कुशल होईल’ असे म्हणून तू ह्या लोकांना व यरुशलेमेस खरोखर फारच चढवले आहेस; इकडे तर तलवार जिवाला जाऊन भिडली आहे.”


जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडले आहे; मी आपला हात त्याच्यावर उगारीन व माझे लोक जे इस्राएल त्यांतून त्याचा उच्छेद करीन.


ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.


पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील.


कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’ असे म्हणतील व अनेकांना फसवतील.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;


आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील;


आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan