Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूचे शुभवर्तमान मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंची शुभवार्तेचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शिक्षा देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 1:8
59 Iomraidhean Croise  

देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.


जो कोणी त्यांना धरू पाहील त्याला लोखंड व भाल्याचा दांडा घेतला पाहिजे; ती आग लागून जागच्या जागी भस्म होतील.”


माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली.


जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझे नाव घेऊन धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपल्या क्रोधाचा मारा कर.


ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस.


हे पारिपत्य करणार्‍या देवा, परमेश्वरा, हे पारिपत्य करणार्‍या देवा, तू आपले तेज प्रकट कर.


तेव्हा फारो म्हणाला, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.”


तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल;


बंडखोर व पापी ह्यांचा बरोबरच विध्वंस होईल; परमेश्वराला सोडणारे नष्ट होतील.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे;


जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत त्यांच्यावर तू आपल्या संतापाचा मारा कर. कारण त्यांनी याकोबाला ग्रासून टाकले आहे, त्याला खाऊन टाकले आहे, त्याचे वसतिस्थान उद्ध्वस्त केले आहे.


कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे; कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या.


जे परमेश्वरापासून पराङ्मुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करीन.”


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’


निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.


ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही; तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”


मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


त्याच्या द्वारे आम्हांला कृपा व प्रेषितपद मिळाले; अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, “हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”


ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.


आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हांला लाजवण्यासाठी बोलतो.


तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो;


अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या [तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून] तुम्हांला कोणी भुरळ घातली?


तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता;


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


त्या दिवशी तुम्ही पुढे येऊन त्या पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात, तेव्हा पर्वत पेटला होता आणि त्याच्या ज्वाला गगनमंडळ भेदून चालल्या होत्या आणि त्याच्यावर काळोख, मेघ व निबिड अंधकार पसरला होता.


तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील;


त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही पर्वतावर चढला नाहीत, परमेश्वराचे वचन तुम्हांला प्रकट करावे म्हणून त्या प्रसंगी मी परमेश्वराच्या व तुमच्यामध्ये उभा राहिलो; तेव्हा तो म्हणाला,


तर न्यायाची आणि विरोध्यांस गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच.


कारण “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन; असे प्रभू म्हणतो.” आणखी, “परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,” असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहीत आहे.


अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’


कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’


तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणार्‍यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले;


आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्‍या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला,


देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून : तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळोत.


जशी सारा अब्राहामाला ‘धनी म्हणून’ त्याच्या आज्ञेत राहिली; तुम्ही चांगले करत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास, तुम्ही तिच्या मुली झाला आहात.


कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणार्‍यांचा शेवट काय होईल?


पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.


त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत.


त्यांना ठकवणार्‍या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”


एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan