Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 थेस्सल 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 देव आमचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीका शहरातील मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यामध्ये असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या ख्रिस्तमंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस, पौल, सीलास व तीमथ्य यांच्याकडून:

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 थेस्सल 1:1
5 Iomraidhean Croise  

तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे, म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बसर्र्ब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले;


मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणार्‍या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप हेल्लेणी होता.


नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते.


कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan