Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, तुझा बाप योनाथान ह्याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन; तुझा बाप शौल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन; आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यास दावीद म्हणाला, भिऊ नको; तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडीलासाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 9:7
32 Iomraidhean Croise  

आपल्याला योसेफाच्या घरी नेले म्हणून ते घाबरले व म्हणाले, “पहिल्या खेपेस आपल्या गोण्यांतून पैसा परत गेला म्हणून आपल्याला आत नेत आहेत; ह्याचा विचार असा दिसतो की, काहीतरी निमित्त काढून आपणांवर तुटून पडावे, आपल्याला गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकवावी.”


तो म्हणाला, “तुमचे कुशल असो, भिऊ नका; तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोण्यांत धन घातले असेल; मला तुमचा पैसा पोहचला.” मग त्याने शिमोनाला त्यांच्याकडे आणले.


मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या, इस्राएल व यहूदा ह्यांचे घराणे तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते.


माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्‍यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?”


राजा त्याला म्हणाला, “तू आपल्या गोष्टी पुन्हा का काढतोस? माझी आज्ञा आहे की, तू व सीबा जमीन वाटून घ्या.”


राजा बर्जिल्लयाला म्हणाला, “माझ्याबरोबर चल; मी तुला यरुशलेमेत आपल्याजवळ ठेवून तुझे पालनपोषण करीन.”


दावीद व शौलाचा पुत्र योनाथान ह्यांची परमेश्वराच्या नावाने आणभाक झाली होती म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेथ ह्याची राजाने गय केली.


“योनाथानाप्रीत्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय?” अशी चौकशी दाविदाने केली.


तर तू आपले पुत्र व चाकर ह्यांच्यासह त्याच्या जमिनीची लागवड कर; तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणत जा; पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेथ माझ्या पंक्तीला नित्य भोजन करील.” सीबाचे पंधरा पुत्र व वीस चाकर होते.


सीबा राजाला म्हणाला, “माझे स्वामीराजे ह्यांनी आपल्या दासाला केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही आपला दास करील.” ह्याप्रमाणे मफीबोशेथ इतर राजपुत्रांप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे.


मफीबोशेथ यरुशलेमेत राहिला; कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी लंगडा होता.


राजाने विचारले, “ज्याच्यावर देवाप्रीत्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय?” सीबा राजाला म्हणाला, “योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे.”


पण गिलादी बर्जिल्लय ह्याच्या पुत्रांवर कृपादृष्टी ठेव, आणि ते तुझ्या पंक्तीला बसणार्‍यांतले असावेत; कारण तुझा भाऊ अबशालोम ह्याच्यापासून मी पळून जात होतो तेव्हा त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली.


त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली व तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे.


जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे.


त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली. आणि तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे.


“सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे : तुम्ही खरा न्याय करा व एकमेकांना प्रेम व करुणा दाखवा,


आमची रोजची भाकर आज आम्हांला दे;


ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.”


पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.


मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जिवेभावे त्याची सेवा करा; त्याने तुमच्यासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत ह्याचा विचार करा.


एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून घेऊ नकोस; परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा ह्या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नकोस.


भिऊ नकोस, माझ्याबरोबर राहा, कारण जो तुझा जीव घ्यायला पाहत आहत आहे, तो माझाही जीव घ्यायला पाहत आहे; माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan