Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-जिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग त्याने दिमिष्कातील अरामात आपले बस्थान वसवले. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. परमेश्वराने, दावीदाला तो जाईल तेथे यश दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथे कुठे गेला, तिथे तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 8:6
26 Iomraidhean Croise  

इस्राएलापुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजर राजाचे जितके अंकित होते तितक्यांनी इस्राएलांशी सल्ला केला व ते त्यांचे अंकित झाले; आणि अम्मोनी लोकांना इतःपर साहाय्य करण्याची अराम्यांना धास्ती वाटली.


त्या वेळी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.


तर आता ती पूर्ण करा; कारण परमेश्वराने दाविदाविषयी म्हटले आहे की, ‘माझा सेवक दावीद ह्याच्या द्वारे मी आपले लोक इस्राएल ह्यांना पलिष्ट्यांच्या व त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवीन.”’


दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन.


त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली; अदोमाच्या सर्व प्रांतांत त्याने ठाणी बसवली व सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे जेथे गेला तेथे तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.


मग त्याने मवाबास मार दिला; त्यांना जमिनीवर निजवून दोरीने मापले आणि जे दोन दोर्‍या भरले त्यांना ठार मारले, व जे एक दोरी भरले त्यांना सोडून दिले. मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले.


हददेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमेस आणल्या.


महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले.


अहाबाच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएलावर उलटला.


यराबामाची कृत्ये, त्याने जे केले ते सर्व, त्याचा पराक्रम, त्याची युद्धे व पूर्वी यहूदाच्या सत्तेत असलेली दिमिष्क व हमाथ ही त्याने कशी परत घेतली ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?


ह्यास्तव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; जिकडेजिकडे तो जाई तिकडेतिकडे त्याला यशःप्राप्ती होई; त्याने अश्शूराच्या राजाविरुद्ध बंड केले; त्याचा तो अंकित राहिला नाही.


मवाबाच्या राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता; तो इस्राएलाच्या राजाला एक लाख कोकरांची व एक लाख एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे.


त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.


त्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले; यहूदा देशात आणि एफ्राइमातील जी नगरे त्याचा बाप आसा ह्याने हस्तगत केली त्यांत त्याने ठाणी बसवली.


हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस.


हे देवा, तू आमचा त्याग केलास ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस.


लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.


गिबा येथे पलिष्ट्यांचे ठाणे होते त्यावर योनाथानाने मारा केला; हे वर्तमान पलिष्ट्यांच्या कानी गेले. मग शौलाने देशभर रणशिंग वाजवून लोकांना सांगितले की, “इब्री लोकहो, कान द्या.”


एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण पलीकडे पलिष्ट्यांचे ठाणे आहे तेथे जाऊ.” पण त्याने हे बापाला कळवले नाही.


मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला; ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले; भूमीही कंपायमान झाली; ह्या प्रकारे प्रचंड कंप झाला.


तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हटले, “चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ; कदाचित परमेश्वर आपले कार्य करील; परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास अडचण नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan