Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग त्याने मवाबास मार दिला; त्यांना जमिनीवर निजवून दोरीने मापले आणि जे दोन दोर्‍या भरले त्यांना ठार मारले, व जे एक दोरी भरले त्यांना सोडून दिले. मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या. त्यापैकी दोन रांगांतील लोकांस ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांस जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला. त्याने त्यांना जमिनीवर झोपविले आणि दोरीच्या अंतराने त्यांचे मोजमाप केले. जे दोन दोर्‍या भरले त्यांना मारून टाकले आणि जे एक दोरी भरले त्यांना जिवंत सोडले. याप्रकारे मोआबी लोक दावीदाच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 8:2
22 Iomraidhean Croise  

त्याने त्या नगराच्या रहिवाशांना बाहेर काढले व त्यांना करवती, लोखंडी दाताळी, लोखंडी कुर्‍हाडी ह्यांचे3 आणि विटांच्या भट्ट्यांचे काम करायला लावले; अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने असेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमेला परत आला.


मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-जिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.


महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले.


अहाबाच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएलावर उलटला.


अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली.


मग त्याने मवाबास मार दिला आणि मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले.


अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासमर्थ झाला.


मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे; अदोमावर मी आपले पायतण फेकीन; पलेशेथाविषयी मी जयघोष करीन.”


परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटांतून कापत कापत बाहेर आले,


हे देवा, तू आमचा त्याग केलास ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस.


मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे; अदोमावर मी आपले पायतण फेकीन; हे पलेशेथा, माझ्यामुळे तू आरोळी मार.”


तंबूंत राहणारे अदोमी व इश्माएली, मवाबी व हगारी,


हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या, आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षीचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा व तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदाचे पाणी प्या;


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


पण काही अधम लोक बोलले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याला काही नजराणा आणला नाही; पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले.


इस्राएलावर राज्य स्थापित केल्यावर शौलाने मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राजे व पलिष्टी ह्यांच्याशी युद्ध केले. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे तो विजयी होई.


तेथून दावीद मवाबातील मिस्पे येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापांना येऊन तुमच्याजवळ राहू द्या.”


त्याने त्यांना मवाबाच्या राजासमोर आणले; दावीद तेथल्या गढीत राहत होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan