Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 दाविदाने हददेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता म्हणून तोई राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारायला व त्याचे अभिनंदन करायला आपला पुत्र योराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हददेजर व तोई ह्यांच्या लढाया होत असत. योरामाने आपल्याबरोबर चांदीची, सोन्याची व पितळेची पात्रे आणली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला, राजा दावीद याच्याकडे पाठवले. हद्देजरशी लढाईकरून त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करून त्यास आशीर्वाद दिले. (हद्देजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा त्याने आपला पुत्र योरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोई यांच्यातही युद्ध होते. योरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या वस्तू आणल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 8:10
9 Iomraidhean Croise  

मग योसेफाने त्यांना क्षेमकुशल विचारले; त्याने म्हटले, “तुम्ही आपल्या म्हातार्‍या पित्याविषयी मागे सांगितले होते, तो सुखरूप आहे ना? तो अजून जिवंत आहे ना?”


सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदीसोन्याबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला अर्पण केली;


दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले.


आपला स्वामीराजा दावीद ह्याच्याकडे येऊन राजसेवक आशीर्वाद देत आहेत की, ‘आपला देव शलमोनाचे नाव आपल्या नावाहून श्रेष्ठ करो व त्याच्या गादीचा महिमा आपल्या गादीहून वाढवो.’ तेव्हा राजाने पलंगावरून नमन केले.


दाविदाने हदरेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता; म्हणून तोवू राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र हदोराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हदरेजर व तोवू ह्यांच्या लढाया होत असत; हदोरामाने बरोबर हरतर्‍हेची सोन्यारुप्याची व पितळेची पात्रे आणली.


पुष्कळ लोकांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेस भेटी आणल्या आणि यहूदाचा राजा हिज्कीया ह्याला मौल्यवान वस्तू नजर केल्या; ह्यामुळे तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने थोर झाला.


जवळून येणारेजाणारे त्यांना एवढेसुद्धा म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हांला प्राप्त होवो, परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो.”


त्या वेळी बलदानाचा पुत्र मरोदख बलदान,1 जो बाबेलचा राजा, त्याने हिज्कीयाला पत्रे व नजराणा ही पाठवली; कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते.


त्याने होमाची समाप्ती केली तोच शमुवेल आला; तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करायला बाहेर गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan