Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव महान करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:9
23 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.


तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो.


तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना तुडवून दाबून टाकले.


दाविदाची शेवटची वचने ही आहेत : “ज्याला उच्चपदावर चढवले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्राएलाचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो :


दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


दावीद क्षार खोर्‍यात अठरा हजार अराम्यांना मारून परत आला तेव्हा त्याचे नाव झाले.


त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली; अदोमाच्या सर्व प्रांतांत त्याने ठाणी बसवली व सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे जेथे गेला तेथे तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.


मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-जिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.


जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे थोर पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे मी तुझे नाव करीन.


त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस; तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस.


मी त्याच्यादेखत त्याच्या शत्रूंना मारून चीत करीन. त्याच्या द्वेष्ट्यांना मारून टाकीन.


‘त्याने अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केले आहे.’


ह्याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.


दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे, आणि परमेश्वर त्याच्याबरोबर असे.


पलिष्ट्यांचे सरदार युद्धास सिद्ध झाले; जेव्हा जेव्हा ते बाहेर निघत तेव्हा तेव्हा दावीद शौलाच्या इतर सेवकांपेक्षा अधिक चतुराईने यश संपादी, ह्यामुळे त्याच्या नावाची ख्याती झाली.


तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.


ह्या प्रकारे शौल, त्याचे तिघे पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले.


मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठवला; तो एक्रोन येथे जाऊन पोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की, “आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्राएलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan