Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 शिवाय दावीदाला हे ही सांग सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा राजा केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “तर आता माझा सेवक दावीदाला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:8
17 Iomraidhean Croise  

नाथान दाविदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस. इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडवले;


ती स्त्री म्हणाली, “देवाच्या प्रजेचे नुकसान करण्याचे आपण हे काय योजले? महाराज आता जे शब्द बोलले त्यांमुळे ते स्वतःच दोषी ठरतात; कारण महाराज स्वत:च्या हाकून दिलेल्यास माघारी आणत नाहीत.


दाविदाची शेवटची वचने ही आहेत : “ज्याला उच्चपदावर चढवले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्राएलाचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो :


लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वराला म्हटले, “पाहा, मी पाप केले, मी दुर्मार्गानेही चाललो, पण ह्या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा.”


गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”


दावीद मीखलेस म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्राएली प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो; आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच.


शलमोन म्हणाला, “तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याच्यावर तुझी मोठी दया असे; तो तुझ्यासमोर तुझ्याशी सत्याने, नीतीने व सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्याप्रीत्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसायला त्याला तू पुत्र दिलास; वस्तुस्थितीही अशीच आहे.


मी आपल्या इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्राएल वंशाकडून मी कोणतेही नगर निवडून घेतले नाही, पण माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर दाविदाला मी निवडून नेमले आहे.


तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्या प्रजेचा, इस्राएलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून, मेंढरांमागे चालत असताना आणले,


दावीद देवाला म्हणाला, “लोकांची मोजदाद करण्याची आज्ञा करणारा मीच ना? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुराचरण केले आहे; ह्या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा, तुझ्या लोकांवर पडून त्यांचा नाश होऊ नये.”


मी कळपांमागे असता परमेश्वराने मला निवडले; परमेश्वर मला म्हणाला, ‘जा, माझे लोक इस्राएल ह्यांना संदेश सांग.’


दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने ‘याकोबाच्या घराण्यासाठी1 वसतिस्थान मिळवण्याची’ विनंती केली,


मग शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना?


तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.


“उद्या ह्या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी प्रांतातला एक मनुष्य पाठवीन, त्याला अभिषेक करून माझ्या इस्राएल लोकांवर अधिपती नेम; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवील; कारण माझ्या लोकांचे गार्‍हाणे माझ्याकडे आले आहे म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan