Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा राजा नाथान संदेष्ट्याला म्हणाला, “पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि देवाचा कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशासाठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 राजाने नाथान संदेष्ट्याला म्हटले, “पाहा, मी येथे गंधसरूच्या भवनात राहतो आणि परमेश्वराचा कोश एका तंबूत आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:2
24 Iomraidhean Croise  

उरीया दाविदाला म्हणाला, “कोश, इस्राएल व यहूदा मांडवात राहत आहेत आणि माझा धनी यवाब व माझ्या धन्याचे सेवक खुल्या मैदानात तळ देऊन आहेत; असे असताना मी घरी जाऊन खाऊपिऊ आणि आपल्या स्त्रीबरोबर निजू काय? आपल्या जीविताची शपथ, आपल्या प्राणाची शपथ, मी असले काम करणार नाही.”


मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “एका नगरात दोन माणसे राहत होती; त्यांतला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता.


सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; तसेच त्याने गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठवले; त्यांनी दाविदासाठी राजमंदिर बांधले.


लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


ही सर्व वचने व दर्शने जशीच्या तशी नाथानाने दाविदाला कळवली.


ती राजाशी बोलत असता नाथान संदेष्टाही आत आला.


पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया. नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूर वीर हे अदोनीयाच्या पक्षाला मिळाले नाहीत.


नाथानाचा पुत्र अजर्‍या कमावीसदारांवर (कारभारी) होता; नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता;


माझा बाप दावीद ह्याचा मनोदय असा होता की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधावे.


सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; आणखी त्याने गंधसरूचे लाकूड, गवंडी व सुतार दाविदासाठी मंदिर बांधायला पाठवले.


लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “माझा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा,


दावीद राजाचे साद्यंत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमुवेल द्रष्टा ह्याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा ह्याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा ह्याच्या ग्रंथात लिहिले आहे.


दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ-यारीमाहून तो आणला होता; त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारला होता.


दावीद व राजाचा द्रष्टा गाद आणि नाथान संदेष्टा ह्यांच्या आज्ञेप्रमाणे झांजा, सारंग्या व वीणा वाजवण्यासाठी लेव्यांना परमेश्वराच्या मंदिरात उभे केले; ही आज्ञा परमेश्वराने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे केली होती.


शलमोनाची अथपासून इतिपर्यंत एकंदर सर्व कृत्ये नाथान संदेष्ट्याच्या ग्रंथात, शिलोनिवासी अहीया ह्याच्या संदेशलेखांत आणि नबाटपुत्र यराबाम ह्याच्याविषयीच्या इद्दो द्रष्ट्याच्या ग्रंथात लिहिलेली नाहीत काय?


त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की,


परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवासमंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन.”


त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


“इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय?


तेव्हा ‘तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.


दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने ‘याकोबाच्या घराण्यासाठी1 वसतिस्थान मिळवण्याची’ विनंती केली,


Lean sinn:

Sanasan


Sanasan