Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:16
29 Iomraidhean Croise  

यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


तो आपल्या राजाचा मोठा उद्धार करतो, आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.”


तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.


ही सर्व वचने व दर्शने जशीच्या तशी नाथानाने दाविदाला कळवली.


आणि माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की, जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील व माझ्यासमोर सत्याने व जिवेभावे चालेल तर इस्राएलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.


तर इस्राएलांवरील तुझे राजासन मी कायमचे स्थापीन; तुझा पिता दावीद ह्याला मी वचन दिल्याप्रमाणे इस्राएलाच्या गादीवर बसायला तुझ्या कुळातला पुरुष खुंटायचा नाही.


मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा उद्धार होईल असे ह्याचे संरक्षण करीन.”


तथापि आपला सेवक दावीद ह्याच्यास्तव यहूदाचा नाश करावा असे परमेश्वराला वाटले नाही, कारण त्याने त्याला वचन दिले होते की तुझ्या संतानाच्या ठायी मी तुझा दीप कायम ठेवीन.


तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होतेस की, ‘तू माझ्यासमोर वागत आलास त्याचप्रमाणे तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची काळजी बाळगून माझ्या नियमांनुसार चालतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्‍या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटणार नाही.’ त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर.


तो नीतिमानांवरील आपली दृष्टी काढत नाही, तर त्यांना राजांबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापतो, व त्यांची उन्नती होते.


तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे;1 तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे.


सूर्य व चंद्र आहेत तोपर्यंत ते पिढ्यानपिढ्या तुझे भय धरोत.


‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन;” (सेला)


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


तर असे होईल की दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे व सरदार रथारूढ व अश्वारूढ होऊन आणि त्यांचे सरदार यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्या नगराच्या वेशींतून येजा करतील व हे नगर सर्वकाळ वसेल.


कारण परमेश्वर म्हणतो, इस्राएलाच्या घराण्याच्या सिंहासनावर बसणार्‍यांची उणीव दाविदाला पडणार नाही;


जो देश माझा सेवक याकोब ह्याला मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील; तेथे ते व त्यांचे पुत्रपौत्र सर्वकाळ वस्ती करतील; माझा सेवक दावीद त्यांच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल.


त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.


सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.


आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”


पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, “हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे; आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे.


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा; कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायमचे वसवील; कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत; आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठायी कसलेही अनिष्ट आढळणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan