Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; त्याने अधर्म केल्यास, मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करतात तशी मी त्याला शिक्षा करीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्यास मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तो जेव्हा चूक करेल, तेव्हा मी त्याला मनुष्याच्या काठीने, मानवांच्या फटक्यांनी शिक्षा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:14
19 Iomraidhean Croise  

तथापि मी त्याच्या हातून सर्वच राज्य हिसकावून घेणार नाही; तर माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा व नियम पाळत असे म्हणून मी त्याला निवडले होते त्याच्याप्रीत्यर्थ मी शलमोनाला त्याच्या हयातीत राजपदावर ठेवीन.


पण तुम्ही व तुमच्या संततीने माझे अनुसरण करण्याचे सोडल्यास, मी तुम्हांला लावून दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्यास आणि मला सोडून अन्य देवांची उपासना व भजनपूजन केल्यास,


मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; तुझ्यापूर्वीच्या राजावरची कृपादृष्टी जशी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी मी दूर करणार नाही;


तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील; तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईन; इस्राएलावरील त्याची गादी मी निरंतरची स्थापीन.’


तो मला म्हणाला, ‘तुझा पुत्र शलमोन हा माझे मंदिर व अंगणे बांधील; त्याला मी आपला पुत्र निवडले आहे व मी त्याचा पिता होईन.


पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस;


मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे;


कारण तुझा उद्धार करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो; कारण ज्या राष्ट्रांतून मी तुझी पांगापांग केली आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन, पण तुझा पूर्ण नाश करणार नाही; तरी मी तुला योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.


आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’


ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये.


आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”


मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो, तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे, हे लक्षात ठेव.


कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे”? आणि पुन्हा, “मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल”?


जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल.’


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan