Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन; मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 7:10
25 Iomraidhean Croise  

मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र दिले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते निघून चोहोकडे भटकतील असे मी करणार नाही.”


मी आपल्या इस्राएलासाठी एक स्थान नेमून देईन, मी तेथे त्यांना रोवीन; म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व तेथून पुढे कधी ढळणार नाहीत;


मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र विदित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते भटकतील असे मी करणार नाही.”


तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.


हे देवा, तूच माझा राजा आहेस; याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर.


मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला.


तू त्यासाठी जागा तयार केलीस आणि त्याने मूळ धरून देश व्यापला.


तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा केली की, “जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा.”


तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील; हेच, हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे; हेच, हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले पवित्रस्थान आहे.


तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलाची लागवड केली, आणि त्यात एक बुरूज बांधला व द्राक्षकुंड खोदले; मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली.


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवड करून ते मी स्थापीन असे मी एकदा बोललो,


मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.


त्यानंतर इस्राएल घराण्याच्या आसपासच्या द्वेष्ट्यांपैकी कोणी त्यांना बोचणारा कांटा व टोचणारी नांगी असे उरणार नाही; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.


मी त्यांना त्यांच्या भूमीत रुजवीन व जी भूमी मी त्यांना दिली आहे तिच्यातून त्यांना ह्यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही,” असे परमेश्वर तुझा देव म्हणतो.


‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”


त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला.


मग पलिष्ट्यांच्या छावणीतून लुटालूट करणारे लोक तीन टोळ्या करून निघाले; एक टोळी शूवाल नामक प्रांताकडे अफ्राच्या वाटेने गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan