Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 6:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे इस्राएलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकेक भाकर, मांसाचा एकेक तुकडा, खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक घरोघर गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषास त्याने भाकरीचा तुकडा, खिसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 नंतर त्याने तिथे जमलेल्या इस्राएली लोकांच्या समुदायातील प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप, मनुक्याची एक वडी दिली, मग सर्व लोक आपआपल्या घरी गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 6:19
16 Iomraidhean Croise  

होमबली व शांत्यर्पणे अर्पण केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला.


आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


आठव्या दिवशी त्याने लोकांची रवानगी केली; ते सर्व राजाचे अभीष्ट चिंतून आपापल्या डेर्‍यांस गेले; आपला सेवक दावीद व आपले लोक इस्राएल ह्यांचे जे कल्याण परमेश्वराने केले त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.


त्याने इस्राएलाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास एकेक भाकर, एकेक मांसाचा तुकडा व खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली.


मग सर्व लोक आपापल्या घरी गेले; आणि आपल्या घराण्यास आशीर्वाद द्यावा म्हणून दावीद आपल्या घरी गेला.


यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अर्पणासाठी मंडळीला एक हजार गोर्‍हे आणि सात हजार मेंढरे दिली; आणि सरदारांनी मंडळीला एक हजार गोर्‍हे व दहा हजार मेंढरे दिली; त्या वेळी पुष्कळ याजकांनी आपणांस पवित्र केले.


राजाने सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी लोकांना आपापल्या डेर्‍यांकडे जाण्यास निरोप दिला; परमेश्वराने दाविदावर, शलमोनावर व आपल्या इस्राएल प्रजेवर जी कृपा केली होती तिच्यामुळे ते आनंदित, हर्षितचित्त झाले होते.


तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम द्या; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे;


उत्सव, चंद्रदर्शने, शब्बाथ व इस्राएल घराण्याचे सर्व सण ह्यांत होमार्पण, अन्नार्पण व पेयार्पण ह्यांची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे; इस्राएल घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणून त्याने पापार्पण, अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावीत.


मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”


सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि ‘घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे,’ असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”


म्हणून तो म्हणतो, “त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना1 कैद करून नेले, व मानवांना देणग्या दिल्या.”


मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले, आणि ते आपापल्या डेर्‍यांकडे चालते झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan