Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचतबागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 शौलाची कन्या मीखल हे सर्व खिडकीतून पाहत होती. परमेश्वराचा कोश नगरात आणत असताना दावीद त्याच्यापुढे नाचत उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला त्याचा विट वाटला. दावीद स्वतःचे हसे करून घेत आहे असे तिला वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेहचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर उड्या मारत आणि नाचत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 6:16
12 Iomraidhean Croise  

दाविदाने शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याच्याकडे जासूद पाठवून सांगितले की, “माझी स्त्री मीखल जी मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा देऊन घेतली तिला माझ्याकडे पाठवून दे.”


तरी दाविदाने सीयोन गड घेतला; हेच ते दावीदपूर.


दाविदाने व सर्व इस्राएल घराण्याने परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला.


आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा नाचत व बागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.


हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालस्ती होत आहे.


कारण तुझ्यासाठी मी निंदा सोसली आहे; लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे;


तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही.


परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”


स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते.


शौल दाविदाला म्हणाला, “पाहा, माझी वडील कन्या मेरब हिच्याशी तुझे लग्न करून देतो; मात्र तुझा पराक्रम माझ्यासाठी होऊ दे, आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” आपला हात त्याच्यावर पडू नये तर पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडावा असे त्याला वाटत होते.


शौलाची कन्या मीखल हिचे दाविदावर प्रेम जडले; लोकांनी हे शौलाला कळवले, तेव्हा त्याला ते पसंत पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan