Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 6:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तागाचे एफोद परिधान करून दावीद त्याच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर नाचत होता,

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 6:14
20 Iomraidhean Croise  

दाविदाने व सर्व इस्राएल घराण्याने परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला.


आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


दावीद, कराराचा कोश वाहणारे सर्व लेवी, गायक व मुख्य गायक कनन्या ह्या सर्वांनी तलम सणाचे झगे परिधान केले होते; दाविदाने तागाचे एफोद घातले होते.


ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.


डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा.


तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस;


गायन व नृत्य करणारे म्हणतील : “माझे सर्व उगम तुझ्याच ठायी आहेत.”


मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या.


आणि मिर्यामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले, “परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत.”


पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्राएल लोकांना सांग.”


जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.


ते प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे; ते बाहेर जातानाही त्याने त्यांच्याबरोबर जावे.


त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला.


तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.


आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.


इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवत व नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा किंवा मुलगी नव्हती.


आणि शिलोच्या मुली नृत्यासाठी बाहेर पडताच द्राक्षमळ्यातून बाहेर निघावे आणि त्यांच्यातल्या एकेकीला एकेकाने धरून बायको करण्यासाठी बन्यामीन देशात अथवा प्रांतात घेऊन जावे.


शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे.


तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावेत, धूप जाळावा आणि माझ्यासमोर एफोद ल्यावे म्हणून इस्राएलाच्या सर्व वंशांतून त्याला मी निवडून नेमले होते की नाही? आणखी तुझ्या मूळ पुरुषाच्या घराण्यास इस्राएल लोकांची सर्व हव्ये मी दिली की नाही?


तेव्हा राजा दवेगास म्हणाला, “चल, तू जाऊन त्या याजकांवर तुटून पड.” तेव्हा अदोमी दवेग याजकांवर तुटून पडला. त्या दिवशी सणाचे एफोद धारण करणार्‍या पंचाऐंशी पुरुषांचा त्याने वध केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan