Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना; त्याने तो ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती, त्या ऐवजी, त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन ओबेद-अदोम गित्ती याच्या घरी ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेहचा कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात घेऊन जाण्यास त्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी, त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 6:10
11 Iomraidhean Croise  

राजा इत्तय गित्ती ह्याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येतोस? तू आपला परत जाऊन राजाजवळ राहा; तू तर परका व हद्दपार केलेला आहेस; तू आपल्या स्थानी परत जा.


मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”


बैरोथकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरे म्हणून राहिले आहेत.


तरी दाविदाने सीयोन गड घेतला; हेच ते दावीदपूर.


दावीद त्या गडावर राहू लागला; त्याला दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली.


आणि त्यांचे भाऊबंद जखर्‍या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यइएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम व ईयेल हे जे द्वारपाळ होते त्यांना दुय्यम दर्जाचे नेमले.


शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍या, बनाया व अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे कर्णे वाजवीत; ओबेद-अदोम व यहीया हे कोशाचे द्वारपाळ होते.


प्रमुख आसाफ व त्याचे दुय्यम जखर्‍या, यहीएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, व यइएल हे सतार व वीणा वाजवत असत आणि आसाफ झांज वाजवत असे;


यहूद, बने-बराक व गथरिम्मोन;


Lean sinn:

Sanasan


Sanasan