२ शमुवेल 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले, तेव्हा राजाने त्यांच्याशी याहवेहसमोर हेब्रोन येथे एक करार केला आणि त्यांनी दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. Faic an caibideil |
परंतु इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मलाच निवडले आहे; मी इस्राएलावर कायमचा राजा व्हावे म्हणून यहूदाने अग्रणी व्हावे आणि यहूदाच्या घराण्यात माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली आणि माझ्या पित्याच्या पुत्रांतून मलाच सर्व इस्राएलावर राजा करावे असे त्याच्या मर्जीस आले.