Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 दाविदाने बैरोथकर रिम्मोन ह्याचे पुत्र रेखाब व त्याचा भाऊ बाना ह्यांना उत्तर दिले की, “ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचवला त्याच्या जीविताची शपथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पण दावीद बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना यांना म्हणाला, “देवाची शपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटातून सोडवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 4:9
14 Iomraidhean Croise  

ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”


शौलाच्या पुत्राजवळ दोन पुरुष सेनानायक होते; एकाचे नाव बाना व दुसर्‍याचे नाव रेखाब. हे बन्यामिनी वंशातला रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र. बैरोथ हे नगरही बन्यामिन्यांच्या प्रांतात मोडत आहे.


तेव्हा राजाने आणभाक करून म्हटले, “ज्याने आजपर्यंत माझा प्राण सर्व संकटांतून सोडवला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,


तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो;


त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणार्‍याच्या हातून सोडवले. शत्रूच्या हातून त्यांना मुक्त केले.


परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे,


नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.


परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.


माझ्या जिवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर; माझे वैरी पाहून माझा उद्धार कर.


मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील.


पाहा, आपला प्राण जसा माझ्या दृष्टीला मोलवान वाटला तसाच माझाही प्राण परमेश्वराच्या दृष्टीस मोलवान वाटो व तो मला सर्व संकटांतून सोडवो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan