२ शमुवेल 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्यांनी ईश-बोशेथाचे शिर हेब्रोनात दाविदाकडे आणले; ते राजाला म्हणाले, “पाहा, आपला शत्रू व आपला प्राण घेऊ पाहणारा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याचे हे शिर आहे; आज परमेश्वराने माझ्या स्वामीराजांप्रीत्यर्थ शौल व त्याचा वंश ह्यांचा सूड उगवला आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते हेब्रोन येथे पोहोचले आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले. रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलाला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शासन केले.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे डोके. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.” Faic an caibideil |