Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 दिवस अजून थोडा उरला होता, तेव्हा सर्व लोक दाविदाने अन्न खावे म्हणून त्याला आग्रह करण्यासाठी आले; पण दावीद शपथ घेऊन म्हणाला, “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा काही खाल्ले तर देव मला तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको असे तो बोलला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 नंतर त्या सर्वांनी येऊन दावीदाने दिवस असताच काही खावे अशी विनंती केली; पण दावीद शपथ घेत म्हणाला, “सूर्यास्ताच्या आधी मी भाकर किंवा काहीही सेवन केले, तर परमेश्वर मला कठोर शासन करोत!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:35
13 Iomraidhean Croise  

शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्राएलाचे घराणे हे सर्व तलवारीने पडले म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले.


त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली; तो उठेना व त्यांच्याबरोबर बसून भोजन करीना.


तुझे हस्त बद्ध केले नव्हते; तुझ्या पायांत बेड्या घातल्या नव्हत्या; अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास.” हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले.


सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यांना ते बरे वाटले; राजा जे जे करी ते ते सर्व लोकांच्या मनास येई.


मी शौलाच्या घराण्याकडून राज्य हिसकावून घेईन आणि दाविदाची गादी दानापासून बैरशेब्यापर्यंत इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर स्थापीन अशी आणभाक परमेश्वराने केली आहे; त्यानुसार मी त्याच्याशी वर्तन केले नाही तर देव अबनेराचे त्या मानाने, किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.”


तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले आणि त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते याबेश येथे आणली व त्यांच्या अस्थी घेऊन याबेशातील एका वृक्षाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.


मृतांविषयी एखाद्याचे समाधान करावे म्हणून कोणी त्यांच्यासाठी भाकरी मोडणार नाहीत; कोणाचे आईबाप मेले तर त्यांचे सांत्वन करण्यास कोणी त्यांच्यापुढे प्याला करणार नाहीत.


उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.”


मग मी केले आहे तसे तुम्ही कराल, तुम्ही ओठ झाकणार नाही व सुतकात लोक अन्न पाठवतात ते तुम्ही खाणार नाही.


इस्राएल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले; आणि “आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढायला पुन्हा जावे काय?” असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “त्यांच्यावर चाल करून जा.”


मग सर्व इस्राएल लोक मिळून बेथेल येथे जाऊन परमेश्वरापुढे रडत बसले; त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे केली.


तुम्ही मराल तेथे मीही मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल; मृत्युखेरीज तुमचा-माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.”


एली म्हणाला, “परमेश्वराने तुला जी गोष्ट सांगितली ती कोणती? माझ्यापासून ती लपवू नकोस; तुला जे काही तो बोलला आहे त्यातले काहीएक तू लपवून ठेवशील तर देव तुझे तसे किंबहुना अधिक शासन करो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan