Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्याने हेब्रोन येथे अबनेराला मूठमाती दिली; अबनेराच्या कबरेजवळ राजा गळा काढून रडला; सर्व लोकही रडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्वजण यांनी विलाप केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 त्यांनी अबनेरास हेब्रोनमध्ये पुरले आणि राजाने अबनेरच्या कबरेजवळ मोठ्याने आकांत केला. सर्व लोकसुद्धा रडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:32
8 Iomraidhean Croise  

शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्राएलाचे घराणे हे सर्व तलवारीने पडले म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले.


तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्‍गार काढले; “माझ्या पुत्रा अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा : तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरेरे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!!”


दाविदाने आपल्या तरुण लोकांना आज्ञा केल्यावरून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे हातपाय तोडून त्यांना हेब्रोनाच्या तळ्याजवळ टांगले. पण ईश-बोशेथाचे शिर नेऊन त्यांनी हेब्रोनात अबनेराच्या कबरेत पुरले.


तर हाही न्यायाधीशांपुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकाच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.


माझ्या द्वेष्ट्याचा नाश झालेला पाहून मला आनंद वाटला असता, त्याच्यावर अरिष्ट आले हे पाहून मला उल्हास वाटला असता,


तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नकोस, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्लासू नये;


तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan