Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तो दोष यवाबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुळाच्या माथी येवो; आणि यवाबाच्या वंशात स्रावी, महारोगी, काठी टेकत चालणारा, तलवारीने पडणारा किंवा अन्नान्न करणारा असा कोणी ना कोणी असल्यावाचून राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 यवाब आणि त्याचे कुटुंबीय या कृत्याला जबाबदार आहेत. तेव्हा अपराधी ते आहेत. याचे फळ त्यांना भोगावे लागेल त्याच्या वंशातील लोक महारोग, पंगुत्व यांनी ग्रासले जातील, युध्दात मारले जातील. त्यांची अन्नान्नदशा होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्याचे रक्तदोष योआब आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर असो! योआबच्या कुटुंबात स्रावी, महारोगी, कुबडीवर टेकलेला, तलवारीने पडणारा, अन्नावाचून राहणारा असा कोणी ना कोणी असल्याशिवाय राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:29
18 Iomraidhean Croise  

दावीद त्याला म्हणाला, “तुझा रक्तपात तुझ्याच माथी असो; परमेश्वराच्या अभिषिक्ताचा मी वध केला असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे.”


ज्या शौलाच्या जागी तू राज्य केलेस त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे, आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम ह्याच्या हाती राज्य दिले आहे; तू रक्तपात करणारा माणूस आहेस, ह्यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस,”


पुढे दाविदाच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा तो म्हणाला, “नेराचा पुत्र अबनेर ह्याच्या खुनासंबंधाने मी व माझे राज्य परमेश्वराच्या दृष्टीने सदा निर्दोषच असणार.


अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता; कारण त्याच्या द्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता.


तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील.” तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्यापुढून चालता झाला.


परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन.


आणि तो उठून काठी घेऊन हिंडूफिरू लागला तर मारणार्‍याला सोडून द्यावे; मात्र तो घरी बसल्याबद्दल त्याचे झालेले नुकसान मारणार्‍याने भरून द्यावे आणि त्याला पूर्ण बरे करवावे.


“इस्राएल लोकांना सांगा की, एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास त्या स्रावामुळे तो अशुद्ध होय.


ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका; कारण खुनाने देश भ्रष्ट होतो, आणि रक्तपात करणार्‍या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्‍चित्त होऊ शकत नाही.


ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.”


मग त्या मारून टाकलेल्या मनुष्याच्या सर्वांत जवळच्या असलेल्या नगरातील वडीलवर्गाने त्या खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या कालवडीवर आपले हात धुवावेत;


कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”


यरुब्बालाच्या सत्तर मुलांचा घात करणारा त्यांचा भाऊ अबीमलेख आणि त्याच्या भावांची कत्तल करण्यास त्याला हातभार लावणारे शखेमकर ह्यांच्यावर दोष ठेवून ह्या खुनाचा बदला घ्यावा ह्या हेतूने देवाने असे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan