२ शमुवेल 3:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 हेब्रोन येथे त्यास आणल्यावर यवाबाने त्यास गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटावर वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेराने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जेव्हा अबनेर हेब्रोनास परत आला, तेव्हा योआबाने त्याला आतील खोलीत बाजूला नेले जसे की, त्याला त्याच्याबरोबर काही खाजगी बोलावयाचे आहे. आणि तिथे त्याचा भाऊ असाहेल याच्या रक्ताचा सूड घ्यावा म्हणून योआबने त्याच्या पोटावर वार केला आणि तो मरण पावला. Faic an caibideil |
सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.