Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 अबनेराने आपल्या नावाने दाविदाकडे जासूद पाठवून सांगितले, “हा देश कोणाचा बरे?” आणखी असेही सांगितले की, “आपण माझ्याशी सलोखा करा; सर्व इस्राएलाचे मन आपल्याकडे वळवण्याच्या कामी मी आपल्याला मदतीचा हात देतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 अबनेरने दूताकरवी दावीदाला निरोप पाठवला, “या प्रदेशावर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याशी करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:12
15 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारे त्याने यहूदाच्या लोकांना एकदिल करून त्यांची मने वळवली; त्यांनी राजाकडे सांगून पाठवले की, “आपण आपले सर्व सेवक घेऊन माघारी या.”’


तेव्हा सर्व इस्राएल येऊन राजाला म्हणू लागले, “आमचे बांधव यहूदाचे लोक हे आपणाला चोरून छपवून घेऊन आले; महाराजांना त्यांच्या परिवाराला व त्यांच्या सर्व लोकांना यार्देनेपार आणले असे का?”


आपण आपल्या द्वेष्ट्यावर प्रेम करता आणि आपणावर प्रेम करणार्‍यांचा द्वेष करता. आपण आज असे प्रकट केले आहे की, सरदार व सेवक हे आपणाला काहीच नव्हत; अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर आपणाला बरे वाटले असते असे मला आज समजून आले आहे.


त्याच्याने अबनेरास काहीएक जबाब देववला नाही, कारण त्याचा त्याला धाक होता.


दाविदाने म्हटले, “बरे, मी तुझ्याशी सलोखा करतो; पण एक गोष्ट तुला केली पाहिजे; ती ही की तू मला भेटायला येशील तेव्हा आपल्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिला घेऊन येणार नाहीस तर तुझी माझी भेट होणार नाही.”


अबनेर दाविदाला म्हणाला, “मी आता जातो आणि सर्व इस्राएल लोकांना माझ्या स्वामीराजांजवळ जमा करतो, म्हणजे ते आपणाशी करार करतील; मग ज्यांच्यावर राज्य करावे अशी आपली इच्छा आहे त्या सर्वांवर आपण राज्य कराल.” दाविदाने अबनेराची रवानगी केली; व तो सुखरूप निघून गेला.


अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.


राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज इस्राएलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हांला कळत नाही काय?


मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan