Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्‍याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 यार्देन ओलांडून त्यांनी अरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.)

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यार्देन पार केल्यावर, त्यांनी अरोएर नगराच्या दक्षिणेकडील खोर्‍यात डेरा दिला, नंतर ते गादमधून जाऊन याजेरकडे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 24:5
12 Iomraidhean Croise  

तथापि राजाच्या म्हणण्यापुढे यवाब व सैन्याचे सरदार ह्यांचे काही चालेना, आणि यवाब व सैन्यांचे सरदार राजापुढून इस्राएल लोकांची मोजदाद करण्यासाठी निघून गेले.


अरोएराची नगरे लोक सोडून गेले आहेत; ती गुरांच्या कळपांची ठिकाणे झाली आहेत. ते तेथे बसतात; त्यांना घाबरवणारा कोणी नाही.


मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठवले; इस्राएल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोर्‍यांना देशाबाहेर हाकून लावले.


रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले.


“अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन


अटारोथ-शोफान, याजेर, यागबहा,


आर्णोन खोर्‍याच्या कडेला अरोएर नगर आहे तेथून व खोर्‍यात जे नगर आहे तेथून गिलादापर्यंत आम्हांला दुर्गम असे एकही नगर राहिले नाही; आपला देव परमेश्वर ह्याने ती सर्व आपल्या स्वाधीन करून दिली;


त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,


त्यांचा मुलुख म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा प्रदेश.


म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून दीबोनापर्यंतचे मेदबाचे पठार,


अरोएर, सिफमोथ, एष्टमो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan