Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 24:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वराला म्हटले, “पाहा, मी पाप केले, मी दुर्मार्गानेही चाललो, पण ह्या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 लोकांस मारणाऱ्या देवदूताला दावीदाने पाहिले. दावीद परमेश्वरास म्हणाला, “माझे चुकले माझ्या हातून पाप घडले आहे. पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले. त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्‍या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 24:17
23 Iomraidhean Croise  

अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय?


तर आता मी विनंती करतो की, ह्या मुलाऐवजी आपल्या ह्या दासाला स्वामींनी गुलाम म्हणून ठेवावे आणि ह्या मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्यावे.


दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे; तू मरणार नाहीस.


प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वराला म्हणाला, “हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे; तर हे परमेश्वरा, आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.”


तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले,


मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळावाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले; तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”


म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.”


हे मानवरक्षका! मी पाप केले असले तर त्यात तुझे काय गेले? तू मला आपले निशाण का करून ठेवले आहेस? मी आपणाला भार मात्र झालो आहे.


मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; “मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन” असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. (सेला)


तू आम्हांला मेंढरांसारखे भक्ष्यरूप केले आहेस; आणि तू राष्ट्राराष्ट्रांमध्ये आमची दाणादाण केली आहेस.


हे देवा, तू आम्हांला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो?


आपली प्रजा म्हणजे याकोबवंश, आपले वतन म्हणजे इस्राएलवंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता तेथून त्याने त्यांना आणले.


मग फारोने मोशे आणि अहरोन ह्यांना ताबडतोब बोलावून आणून म्हटले, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”


तो त्यांना म्हणाला, “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.”


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.”


तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan