२ शमुवेल 24:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला हे सांगितले; त्याने त्याला विचारले, “तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असताना तू त्यांच्यापुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात तीन दिवस मरी यावी? ह्याचा चांगला विचार कर; ज्याने मला पाठवले त्याला मी काय उत्तर देऊ ते पाहा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 गादने दावीदाकडे येऊन त्यास हे सर्व सांगितले. तो दावीदाला म्हणाला, “तिन्हीपैकी एकीची निवड कर. तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा शत्रूंनी तीन महिने तुझा पाठलाग करावा, की तीन दिवस रोगराई पसरावी? विचार कर आणि मी परमेश्वरास काय सांगावे ते सांग.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “तुमच्यासमोर देशभर तीन वर्षांचा दुष्काळ असावा? किंवा शत्रूकडून तुमचा पाठलाग होत असताना तीन महिने तुम्ही त्यांच्यापासून पळ काढावा? किंवा तुमच्या देशात तीन दिवस पीडा यावी? तर आता यावर विचार करून ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.” Faic an caibideil |