Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 23:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 कबसेल येथील एक शूर मनुष्य होता, जो यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे बर्फाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 23:20
19 Iomraidhean Croise  

शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते.


यवाब इस्राएलाच्या सर्व सैन्यावर होता; यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी ह्यांच्यावर होता;


त्या तिघांहून त्याची महती अधिक होती म्हणून तो नायक झाला ना? तरी त्या पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही.


त्याने एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार मारले; त्या मिसर्‍याच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला; व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला.


असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले.


करेथी व पलेथी (व्यक्‍तिगत सुरक्षाधिकारी) ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्र मंत्री होते.


पण त्याने मला, तुझ्या सेवकाला आणि सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया व तुझा सेवक शलमोन ह्यांना आमंत्रण केले नाही.


तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया हे करेथी व पलेथी ह्यांना बरोबर घेऊन खाली गेले आणि शलमोनाला दावीद राजाच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन गेले.


पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया. नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूर वीर हे अदोनीयाच्या पक्षाला मिळाले नाहीत.


राजाने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला हुकूम केल्यावरून त्याने जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि तो प्राणाला मुकला. शलमोनाच्या हस्ते राज्याला बळकटी आली.


दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे :


करेथी व पलेथी ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्रही राजाचे मंत्री होते.


तेव्हा अदोमाचे अधिपती हैराण झाले; मवाबाचे नायक थरथरा कापत आहेत; सर्व कनानवासी गलित झाले आहेत.


यहूदाच्या संतानाच्या वंशाला दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील ही नगरे मिळाली : कबसेल, एदेर व यागूर;


Lean sinn:

Sanasan


Sanasan