Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 23:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 सरूवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अबीशय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले व त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 सरुवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जेरुइयाहचा पुत्र योआबचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांवर उगारून त्यांना मारून टाकले होते, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 23:18
11 Iomraidhean Croise  

वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्याने अम्मोन्यांसमोर त्यांची व्यूहरचना केली.


अरामी पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अबीशय ह्याच्यापुढून पळून जाऊन नगरात शिरले. तेव्हा यवाब अम्मोन्यांशी लढण्याचे सोडून यरुशलेमेस परत आला.


मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”


सरूवेचे तिघे पुत्र यबाव, अबीशय व असाएल तेथे होते; त्यांतला असाएल हा हरिणासारख्या चपळ पायांचा होता.


यवाबाच्या हाती असलेल्या तलवारीकडे अमासाचे लक्ष गेले नाही; त्याने अमासाच्या पोटात ती भोसकून त्याची आतडी जमिनीवर पाडली; त्याने त्याला पुन्हा वार केला नाही; तेवढ्यानेच त्याचा प्राण गेला, मग यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचा पाठलाग केला.


त्या तिघांहून त्याची महती अधिक होती म्हणून तो नायक झाला ना? तरी त्या पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही.


यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी अबनेराचा वध केला; कारण त्याने त्यांचा भाऊ असाएल ह्याला गिबोनाच्या लढाईत मारले होते.


व त्यांच्या बहिणी सरूवा व अबीगईल ह्या होत. सरूवेचे अबीशय, यवाब व असाएल असे तिघे पुत्र होते.


जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan